राजकीय पार्श्वभूमी

राजकीय पार्श्वभूमी :

वडील कालकथित एल. एस.सोनकांबळे (लक्ष्मन शंकर सोनकांबळे) मूळगाव कसगी,ता.उमरगा,जि.उस्मानाबाद.१९६६ पासून पुण्यामध्ये वास्तव्य आर.टी.ओ. ची नोकरी सोडून सक्रिय राजकारणात बारामती लोकसभा,बोपोडी विधानसभा,पुणे मनपा निवडणुका लढवल्या.१९९२ ला पुणे मनपा मध्ये विजयी.डिसेंबर १९९३ मध्ये अपघाती निधन त्यामुळे फेब्रु १९९४ च्या पोटनिवडनुकीमध्ये मी विजयी.
त्यानंतर १९९७ पुणे व २००२,२००७,२०१२ (पिं.चिं.मनपा.)मध्ये सलग 5 वेळा विजयी.

पक्ष : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)

 • रिपब्लिकन पक्षामध्ये महिला आघाडी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश म्हणून कार्यरत विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग.
 • एल.एस.सोनकांबळे प्रतिष्ठान तर्फे सौष्ठव स्पर्धा,कराटे स्पर्धा,महिलांसाठी विविध उपक्रम,महिला बचतगट,रक्तदान शिबीर,धार्मिक सहलींचे आयोजन,विविध कोर्सेस प्रकल्प
 • धार्मिक कार्यक्रम : बौध्द धम्मातील महत्वपूर्ण धार्मिक कार्यक्रम वर्षावास तसेच साप्ताहिक धम्मवंदना,ख्रिसमस,गणेशोत्सव इ.कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभाग व संयोजन.
 • २०१४ ‘मावळ लोकसभा’ चे महायुतीचे खासदार आदरणीय श्रीरंगआप्पा बारणे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग आर.पी.आय.व मागासवर्गीयांचे प्रत्येक मत महायुतीला देण्याचा आग्रह.

पिंपरी विधानसभा मतदार संघातील सध्यस्थिती :

 • रिपब्लिकन पक्षाची एकमेव नगरसेविका महापालिकेमध्ये शिवसेना-भाजपा सोबत आघाडी.
 • भाजपाचेही एकाच नगरसेवक पिंपरी मतदार संघामध्ये आहे.
 • पिंपरी मतदार संघातून खासदार बारणे यांना ७५ हजार मतांची आघाडी.
 • बहुसंख्य झोपडपट्ट्या आहेत.आणि आर.पी.आय.च्या सर्वात जास्त शाखा व मतदार या मतदार संघामध्ये आहेत.
 • चंद्रकांता सोनकांबळे या नावाबद्दल,व्यक्तीबद्दल प्रचंड आदर व सहानुभूती,प्रामाणिक व अभ्यासू नगरसेविका म्हणून सलग ५ वेळा निवडून आल्या,म्हणून त्यांनाच आमदारकीचे तिकीट मिळावे अशी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांची अपेक्षा.
 • चंद्रकांता सोनकांबळे यांना तिकीट दिल्यास पिंपरी,चिंचवड,भोसरी या तिन्ही मतदार संघामध्ये मराठवाडा (बीड,लातूर,उस्मानाबाद,सोलापूर व कर्नाटक सीमा) या लोकांचे मतदान महायुतीला मिळेल.कारण चंद्रकांता सोनकांबळे यांचे वडील हे मराठवाड्यातीलच आणि त्यांना मानणारा वर्ग हि मोठ्या प्रमाणात आहे.
 • दलित चळवळीचा चेहरा आणि चळवळीची एकनिष्ठ म्हणून चंद्रकांता सोनकांबळे यांना तिकीट दिल्यास महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ही महायुतीची सत्ता आणण्यासाठी मदत होऊ शकते.
 • पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत विविध समित्यांवर काम केल्यामुळे वीस वर्षाचा प्रशासकीय अनुभव त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सक्षम उमेदवार म्हणून ही पहिले जाते.
 • सध्या नगरसेविका असलेला प्रभाग क्र.६४ दापोडी-बोपखेल तसेच दापोडी-फुगेवाडी या तिन्ही गावातून व प्रभागातून प्रचंड प्रतिसाद,दापोडी गावाची मुलगी म्हणून दापोडी गावातून भार्घास पाठींबा त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक मतदान या प्रभागातून मिळू शकते.
 • महिला असूनही पुरुषांच्या वार्डमधून यापूर्वी निवडून आल्या आहेत.एक महिला म्हणून त्या सक्षम आहेत.