माझ्या विषयी

चंद्रकांता लक्ष्मण सोनकांबळे

रिपाई भाजपा युतीचे उमेदवार (प्रभाग ३० अ )


राजकीय कार्यकीर्द

  • सलग पाच वेळा निवडूण येणाऱ्या कार्यक्षम नगरसेविका.
  • १९९४ पोटनिवडणूक पुणे मनपा .
  • १९९७ सार्वत्रिक निवडणूक पिंपरी चिंचवड मनपा .
  • २००२ सार्वत्रिक निवडणूक पिंपरी चिंचवड मनपा .
  • २००७ सार्वत्रिक निवडणूक पिंपरी चिंचवड मनपा .
  • २०१२ सार्वत्रिक निवडणूक पिंपरी चिंचवड मनपा .

प्रिय, नागरिक बंधू भगिनींनो, सप्रेम जयभिम,नमस्कार,सलाम आलेकूम, जय महाराष्ट्र,जय भारत! आपण गेली २० वर्षे मला आपला लोकप्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडून पाठवत आहात.दापोडीचा सर्वांगीण विकास व्हावा.या अपेक्षेसोबतच तो योग्य प्रकारे व्हावा या भावनेने आपण माझी निवड करत आहात.आपल्या या विश्वासास आजमितीला मी पात्र ठरले आहे आसे मला वाटते. १९९४ मध्ये माझे वडील दिवंगत नगरसेवक एल.एस.सोनकांबळे (दादा) यांच्या आकस्मित निधनानंतर आपण मला सदरच्या पोटनिवडणुकीत भारघोष मतांनी विजयी केले.त्यानंतर १९९४ पासून १९९७ पर्यंत जेमतेम अडीच वर्षीच्या कालावधीमध्ये मला जेवढे शक्य झाले तेवढे काम पुणे महानगरपालिकेतून पूर्ण करून घेतले.मुख्यत्त्वे करून गुलाबनगर,पवारवस्ती सारख्या नदीच्या कडेला असणाऱ्या झोपडपट्ट्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला.तसेच सिमेंट काँक्रीटचे रस्ते करून काळू काटेचाळ व महात्मा फुलेनगरचेरस्ते तयार करून दिले. इतरअनेक विकासाची कामे होत असतांना १९९७मध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीत आपण मला दुसऱ्यांदा मला निवडून दिले परंतु निवडणूकि नंतर चारच महिन्यामध्ये दापोडी वार्ड पुणे महानगर पालिकेतून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये गेला. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णया मुले आमची फारच धावपळ झाली. आम्ही नगरसेवक पुणे म.न. पा. मधे व वार्ड मात्र पिं.चिं.मनपा.मध्येअसे काम करत दापोडीतील महत्त्वाचे कामे पार पाडली. दापोडी गावठाण तसेच इतर वस्त्यांमध्येपिण्याच्या पाण्याचाप्रश्न भेडसावत असताना मी स्वतः व नगरसेवक चंद्रकांत काटे आम्ही पिं. चिं च्याआयुक्तांना भेटून पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव मांडला. तो मंजूरहि झाला आज पाण्याची टाकी आपल्या समोर आहे. पिं.चिं.मनपामध्ये अधिकृत काहीही अधिकार नसताना स्वचतेचे प्रश्न,शौचालायाचे प्रश्न, दिवबात्तीचे प्रश्न मांडत ते सोडवून घेतले व शौचालायाचे कामे झाली.मनपाशाळादापोडी येथील सार्वजनिक शौचालाय खास म.फुले नगरच्या लोकांसाठी बांधली गेली आहे.पुणे मनपा.मधे हि केवळ वार्ड नाही म्हणून गप्प न बसता पुणे शहरातील इतर वार्डमध्ये विकासाची कामे केली आमच्या वार्डासाठी असलेल्या बजेटमधून झोपडपट्याची कामे केली. त्यानंतर २००२च्या निवनुकीमध्ये अनेक संकटांवर, दादागिरीवर, दहशतीवर मात करून आपण मला निवडून दिले. त्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. रेल्वे भुयारी मार्ग, संत तुकाराम महाराज पालखी विसावा ओटा, सुलभ शौचालय, सांस्कृतिक भवन,रस्ते,पाणी,ड्रेनेज लाईन, लाईट,महिला बचत गट, इ.अशी अनेक अभिमान वाटावा अशी कामे करता आलीत. याचे मला फार समाधान वाटते. महानगरपालिकेच्या कामाव्यतिरिक्त इतर अनेक सामाजिक, राजकीय,धार्मिक, शैक्षणिक,सांस्कृतिक, कामे मला करता आली. आपल्या सर्वांच्या पाठबळाने आज मी स्वताः पुणे, पिं ची.तसेच महाराष्ट्रभर सामाजिक कार्यकर्ता म्हणून नावारूपाला आले यात आपल्या सर्वांचे फार मोठे योगदान आहे.

आयु.चंद्रकांता लक्ष्मण सोनकांबळे एम.ए (हिंदी),डी.एड नगरसेविका, पिं.चिं मनपा पत्ता : सिद्धार्थनगर,दापोडी,पुणे१२. नोकरी :आलेगावकर प्राथमिक विद्यालय,खडकी,पुणे ३.येथे शिक्षीका म्हणून गेली २० वर्षे सेवेत कार्यरत.(सध्या रजेवर)