ध्येय व उद्दिष्ट्ये

विधानसभा मतदार संगाच्या दृष्टीने विकासाच्या भावी योजना

 • महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये ५०० स्क्वे.फूट घराची मागणी करणार.
 • नदीच्या कडेने संरक्षण भिंत बांधणार.
 •  मतदारसंघात अत्याधुनिक मुस्लीम दफनभूमी करणार.
 • रेल्वे भुयारी मार्गातून बापुकाटेचाळ,गुलाबनगर येथे रेल्वे लाईनच्या कडेने तसेच पुढे नदीच्या कडेने नविन पुलापर्यंत १०० फुटी रस्ता तयार करणार.
 • मतदारसंघात भव्य असे रुग्णालय उभारणार.
 • संपूर्ण मतदारसंघात भूमिगत केबल टाकून घरच्या छतावर असलेले केबलचे जाळे काढून टाकणार.
 • प्रत्येक झोपडीधारकांना म.न.पा.चे फोटोपास मिळवून देणार.
 • मतदारसंघातील अनधिकृत स्टॉल धारकांना अधिकृत जागा व परवाना मिळवून देण्याचे काम करणार.
 • मतदारसंघात कायमस्वरूपी अत्याधुनिक भाजी मार्केट बांधणार.
 • मतदारसंघातील सर्वच राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला कायमस्वरूपी संरक्षण देण्याचे धोरण आखणार.
 • मतदारसंघात पोहण्याचा तलाव बांधणार.
 • उर्वरित वस्त्यांमध्ये समाजपयोगी कामासाठी समाजमंदिर बांधणार.
 • उघड्या गटारी बंद करून ड्रेनेज लाईनला जोडणार.
 • प्रत्येक वस्तीमध्ये वाचनालय बांधणार.
 • प्रत्येक वस्तीमध्ये ग्रंथालय बांधणार.
 • मतदारसंघातील मुलांसाठी खेळाचे मैदान तयार करणार.
 • मतदार संघातील तरुणांना मोफत संगणक प्रशिक्षण देणार.
 • मतदारसंघातील लोकांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी उपाययोजना करणार.
 • तरुण विधवा महिलांसाठी व सर्वच महिला बचत गटांना व्यवसाय उपलब्ध करून देणार.
 • प्रत्येक वस्तीमध्ये आभ्यासिका बांधणार.
 • जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार.
 • अत्याधुनिक व्यायामशाळा बांधणार.
 • महिलांसाठी व्यायामशाळा बांधणार.
 • हृदयशस्त्रक्रिया सारख्या महत्वपुर्ण शत्रक्रियेसाठी म.न.पा तर्फे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार.
 • रेल्वे हद्दीतील व नदीपत्रातील झोपड्यांची पुनर्वसन करावयाचे ठरलेच तर मतदारसंघातील ५०० स्क्वे.फुटाचे घर मिळवण्यासाठी प्रयत्न करणार.
 • बेरोजगार तरुण व तरुणींना महापालिके तर्फे उद्योग व व्यवसाय निर्माण करून देणार.